hollywood news : ‘ हॉलिवूड अभिनेता ह्यू जॅकमनच्या लग्नाशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. लग्नाच्या २७ वर्षांनंतर तो पत्नी डेबोरा-ली फर्नेसपासून विभक्त होतोय. त्याने वेगळे होण्याची घोषणा केली आहे.
रिपोर्ट्सनुसार, ह्यू आणि डेबोरा-ली फर्नेसचे नात्यात बऱ्याच दिवसापासून काही तणाव बघायला मिळाला. त्यामुळे दोघांनीही हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे. Hugh Jackman And Wife Deborra-Lee Furness Announce Separation
ह्यू जॅकमन आणि त्यांची पत्नी डेबोरा-ली फर्नेस यांनी विभक्त होण्याबाबत सांगितले, ‘आम्ही पती-पत्नी म्हणून जवळजवळ 3 दशके एका अद्भुत, प्रेमळ वैवाहिक जीवनात एकत्र राहण्यात धन्यता मानली. आमचा प्रवास आता बदलत आहे आणि वैयक्तिक वाढीसाठी आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.’ Hugh Jackman And Wife Deborra-Lee Furness Announce Separation
जॅकमन आणि फर्नेस 1995 मध्ये टीव्ही मालिका ‘कोरेली’ च्या सेटवर भेटले आणि लवकरच त्यांनी लग्न केले. दोन्ही ऑस्ट्रेलियन अभिनेत्यांना ऑस्कर (२३) आणि अवा (१८) ही मुले आहेत. ह्यूने वैयक्तिकरित्या डेबोरासाठी रिंग तयार केली होती. त्यांच्या लग्नाच्या अंगठ्यावर ‘ओम परमार मैनामर’ असे संस्कृतमध्ये लिहिले होते. याचा अर्थ ‘आम्ही आमची युनियन एका मोठ्या स्रोताला समर्पित करतो.’