मुंबई : बॉलीवूडमधील अभिनेत्री आणि एक मॉडेल अशा दोघींना अटक करून पोलिसांनी एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांनी गुरुवारी रात्री गोरेगाव येथील एका पंचतारांकित हॉटेलवर धाड टाकून दोन मुलींची सुटका केली आहे.
पोलिस उपायुक्त डी एस स्वामी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मिळालेल्या खबरीच्या आधारे संबंधित पंचतारांकित हॉटेलवर धाड टाकली. त्यात बॉलिवूड अभिनेत्री अमृता धनोआ (वय 32) आणि मॉडेल रिचा सिंग यांना अटक केली.
मुंबई पोलिसांच्या एका स्पेशल टीमने गुरुवारी रात्री गोरेगावमधील एका पंचतारांकित हॉटेलवर धाड टाकली. पोलिसांना माहिती मिळाली होती की, काही टीव्ही अभिनेत्री, मॉडेल्स आणि बॉलिवूडशी संबंधित काही तरुणी या भागात सेक्स रॅकेट चालवत आहेत. तसेच हॉटेल्समध्ये येणाऱ्या ग्राहकांना मुली पुरवतात. या दोन्ही तरुणी बॉलिवूडमध्ये करिअर बनवण्यासाठी मुंबईत आल्या होत्या.