Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निवडणूक भरारी पथकाने 1 कोटी 87 लाखांहून अधिक रोकड जप्त केली आहे. सायन पोलीस आणि मुंबईच्या निवडणूक भरारी पथकाने मुंबईतील सायन परिसरातून एका कारमधून ही रोकड जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारमधून पोलिसांनी 1 कोटी 87 लाख 80 हजार रुपये जप्त केली. पोलीस आणि निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पैशांसह वाहन आणि चालकाला ताब्यात घेतले आहे. याबाबत आयकर विभागाला माहिती देण्यात आली असून त्यांच्या चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.