Salman Khan’s house | Mumbai Crime Branch – अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील निवासस्थानासमोर रविवारी (14 एप्रिल) दोन अज्ञात हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.
या प्रकरणी नवी मुंबईच्या परिसरातून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन संशयित ताब्यात देखील घेतले. या गोळीबाराची राज्य सरकारकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. या घटनेनंतर सलमानच्या सुरक्षेत आणि त्याच्या घराबाहेरील सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.
नवी मुंबईतून ज्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या दोघांना ताब्यात घेण्याआधी पोलिसांकडून या घटनेत वापरलेल्या दुचाकीचा शोध घेतला. । Salman Khan’s house | Mumbai Crime Branch
ज्यानंतर या घटनेत हल्लेखोरांनी वापरलेली दुचाकी पनवेलमधील एका व्यक्तीच्या नावावर असल्याची माहिती समोर आली. तर गुन्हे शाखेने तपास करत या दुचाकीच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ही दुचाकी आपण काही दिवसांपूर्वी विकल्याचे या मालकाकडून सांगण्यात आले होते.
दरम्यान, अश्यातच गुन्हे शाखेच्या पोलिसांना एक मोठं यश मिळाले आहे. गुजरातमधील सूरत येथे तापी नदीत फेकलेली दुसरे पिस्तुलही पोलिसांनी हस्तगत केले आहे. पोलिसांकडून दोन दिवस तापी नदीत शोध मोहीम सुरू होती.
या दोन दिवसांच्या अथक शोधमोहिमेनंतर दोन पिस्टल आणि 3 मॅगझिन नदीत सापडल्या. सोमवारपासून गुन्हे शाखेचे पथक गुजरातच्या तापी नदीत शोधमोहीम करत होते. युनिट 9 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्वात शोधमोहिम सुरू होती. त्यामुळे आता या घटनेची चौकशी आणखी वेगाने होणार आहे.