दिवसभरात 98 जणांना लागण : करोना रुग्णांची संख्या पोहोचली 1110 वर
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाची रुग्ण वाढ सुरूच आहे. शहराच्या विविध भागांतील तब्बल 93 जणांना आज (शुक्रवारी) करोनाची लागण झाली आहे. तसेच शहराबाहेरील पाच जणांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सायंकाळी सातपर्यंतची ही आकडेवारी असून, आजपर्यंत शहरातील 1110 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 544 जण करोनामुक्त झाले आहेत.
पालिकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शहरातील जुनी सांगवी, अजंठानगर, संत तुकारामनगर भोसरी, श्रीदत्त कॉलनी, बेलठीकानगर थेरगाव, गुलाबनगर, पवार वस्ती, जयभीमनगर, सिद्धार्थनगर दापोडी, साईबाबानगर चिंचवड, नाणेकर चाळ पिंपरी, काळेवाडी, संजय गांधीनगर पिंपरी, भीमनगर, नेहरुनगर, त्रिवेणीनगर, यमुनानगर, दत्तनगर दिघी, आनंदनगर, वैष्णवदेवी मंदिर पिंपरी, जाधववाडी, चिखली, रमाबाईनगर, बौद्धनगर, मिलिंदनगर पिंपरी, अंकुश चौक निगडी, शिवतीर्थनगर रहाटणी, पोलीस कॉलनी वाकड, जयमालानगर सांगवी, सुदर्शनगर पिंपळेगुरव परिसरातील 93 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये 53 पुरुष आणि 40 महिलांचा समावेश आहे.
शहराबाहेरील आंबेडकर वसाहत औंध, जुन्नर येथील तीन पुरुष आणि दोन महिला अशा पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. दिवसभरात एकूण 98 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर, कोणतेही लक्षणे नसलेल्या 28 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. शहरात आज शुक्रवारपर्यंत 1110 जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यातील 544 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 37 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.