पिंपरी – कामगारांचे हित जोपासणे आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढा उभारून कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील संवादाचे माध्यम म्हणून पदाधिकारी काम करतील. कामगारांच्या तक्रारीकडे लक्ष देवून व्यवस्थापनासमोर त्या कामगारांचे सामूहिक गाऱ्हाणे मांडणे आणि औद्योगिक संबंधांचे नियमन, तक्रारींचा निपटारा, कामगारांच्या वतीने नवीन मागण्या आदी कामे संघटनेमार्फत होतील, असा विश्वास भाजपा कामगार मोर्चा शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी व्यक्त केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार मोर्चा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. भाजपा कामगार मोर्चा कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष १, महिला अध्यक्ष १, सरचिटणीस ६, उपाध्यक्ष १३, चिटणीस १५, कार्यकारी सदस्य १६, निमंत्रित सदस्य ५, कायदेशीर सल्लागार १, प्रसिद्धी प्रमुख १ यांची घोषणा करण्यात आली.
महिलाध्यक्ष निकिता गोसावी, सरचिटणीस सुनील बाबुराव नाईकनवरे, धिरज हेमंत धाकड, भागवत खेडकर, संजय बडे, प्रविण घुले, चंद्रकांत देशमुख. उपाध्यक्ष किशोर बागुल, दिपक गळीतकर, विकास पवार, उमेश गायकवाड, नरेंद्र जिनवाल, वैजिनाथ नेहरकर, विनोद शिंदे, गजानन सुकनिकर, रवी खैरनार, गणेश ज. मुसळे, हौशीराम कर्डीले, महेश बारसावडे, हनुमंत जाधव यांची निवड करण्यात आली. तर, कायदेशीर सल्लागार पदावर ॲड. प्रशांत भागवत यांची निवड केली. प्रसिद्धी प्रमुख सचिन महाले. चिटणीस संदीप दत्तात्रय तंटक, मिनार गजने, सागर कटारे, नथुराम देसाई, प्रदीप डांगे, दिलीप खर्चे, गिरीष क्षीरसागर, संतोष चोरडिया, दिपक राऊत, ईश्वर तायडे, हरिदास खाडे, खंडाप्पा बिराजदार, भाऊसाहेब जाधव, चेतन चपटे, विनायक शेंडगे यांची निवड झाली.
कार्यकारी सदस्य गणेश आव्हाड, राजेंद्र अचलेकर, अजिनाथ आंधळे, सुरेश बांगर, किरण चव्हाण, बाजीराव जायभाय, किरण पाटील, नितिन पाटील, गणेश जोशी, भानुदास आघाव, अंकुश नागरगोजे, हमीद बागबान, विनोद पाटील, पांडुरंग घोगरे, भाग्येश कापडी, सतीश खटाळ. निमंत्रित सदस्य प्रकाश मुगडे, रामचंद्र भोसले, दादासाहेब वारे, बापूसाहेब भोसले, शंकर पाटील यांची निवड करण्यात आली.