पिंपरी – पिंपरी चिंचवड न्यायालय, पुणे जिल्हा विधी प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशन यांच्या वतीने राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात नेहरूनगर येथील ३२९ आणि आकुर्डी येथील ३३४ असे एकूण ६६३ दावे निकाली काढण्यात आले.
नेहरूनगर येथील न्यायालयात विविध प्रकारचे ३२९ दावे निकाली काढण्यात आले. यात ४७ हजार ८०० रुपये महसूल जमा करण्यात आला. आकुर्डी येथील न्यायालयात पाणीपट्टी आणि मिळकत कराची एकूण ३३४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून २ कोटी २९ लाख १२ हजार रुपयांचा महसूल जमा झाला. तर दोन्ही ठिकाणचा मिळून २ कोटी २९ लाख ५९ हजार ८०० रुपयांचा महसूल जमा झाला.
कार्यक्रमाची सुरुवात पिंपरी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश वानखेडे, गजभिये तसेच पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व न्यायदेवतेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी लोक आदालतमध्ये जास्तीत जास्त खटले निकाली निघावे यासाठी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सुदाम साने, ॲड. संगीता परब यांनी उपस्थित नागरिक व खटल्याचे काम पाहणारे वकिलबंधू भगिनी यांना समजुतीने हे सर्व प्रकरणे निकाली निघावे असे आवाहन केले. लोकअदालतमध्ये पॅनल जज ॲड. आस्मा मुजावर, ॲड. वैष्णवी काकडे, ॲड. संघर्ष सूर्यवंशी यांनी भाग घेतला. तसेच सर्व कमिटीने आकुर्डी न्यायालयास भेट देऊन तेथील न्यायाधीश कुलकर्णी यांची भेट घेऊन कामकाजाबद्दल माहिती घेतली.
तळवडे आगीतील मृतांना श्रद्धांजली
ज्योतिबानगर, तळवडे येथील फटाक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत होरपळून मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप महिलांना उपस्थित न्यायाधीश व पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष व कार्यकारणी तसेच नागरिक यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी राणी पुतळाबाई कॅालेजच्या विद्यार्थींनी तसेच बारचे सभासद ॲड. सुजाता बिडकर, ॲड. सारिका परदेशी, ॲड. विवेक राऊत, ॲड. वैभव कल्याणकर, ॲड. अजिंक्य लोमटे, ॲड. शंकर घंगाळे तसेच पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, उपाध्यक्ष ॲड. प्रतीक्षा खिलारी, सचिव ॲड. धनंजय कोकणे, महिला सचिव ॲड. मोनिका सचवाणी, सह-सचिव ॲड. उमेश खंदारे, खजिनदार ॲड. अजित खराडे, ॲाडिटर ॲड. संदीप तापकीर, सदस्य ॲड. अस्मिता पिंगळे, ॲड. आयाज शेख, ॲड. फारूख शेख, ॲड. दशरथ बावकर, ॲड. स्वाती गायकवाड, ॲड. मिनल दर्शले उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिव ॲड. धनंजय कोकणे यांनी केले. आभार उपाध्यक्ष ॲड. प्रतीक्षा खिलारी यांनी मानले.