अकोले – पालक व मुलांमध्ये मैत्रीचे, प्रेमाचे नाते निर्माण झाले पाहिजे. मुलांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे. दिवसेंदिवस संस्काराचा अभाव होत चालला आहे. निर्भीड, ज्ञानी सुसंस्कारी पिढी घडविण्यासाठी चांगली संगतही महत्वाची आहे.
मुलांनीही चांगले शिक्षण घेत कष्ट व मेहनतीने आपल्या करिअरचे नियोजन करावे, असे आवाहन अकोलेचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी केले.
मॉडर्न हायस्कूल ज्यु. कॉलेज आर्टस् ॲण्ड कॉमर्स व भास्करराव कदम (गुरुजी) सायन्स, अकोले या कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी श्रमदान शिबीर देवठाण येथे झाले. या शिबिराचे उद्घाटन अकोलेचे पोलीस निरीक्षक विजय करे यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी दिलीप शहा होते.
मॅाडर्न हायस्कूलचे चेअरमन सतीश बुब ,प्राचार्या सविता मुंदडा, उपप्राचार्य दीपक जोंधळे, पर्यवेक्षक सुधीर जोशी, उपमुख्याध्यापिका सुनिता जामगावकर, माजी सदस्य अरुण शेळके, प्राचार्य चंद्रकांत सहाणे, सरपंच निवृत्ती जोरवर, सदस्य केशवराव बोडके उपस्थित होते.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. दीपक जोंधळे यांनी तर प्रा. संपत वाळके यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंगल कोल्हे यांनी केले. यावेळी कनिष्ठ विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते.