Narendra Modi : विधानसभा निवडणुकांतील भाजपच्या यशाने सुखावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीतही विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला. भाजपने ३ राज्यांमध्ये विजय प्राप्त केला. ती हॅट्ट्रिक २०२४ मधील हॅट्ट्रिकची गॅरंटी देणारी आहे, असे मोदींनी म्हटले.
विधानसभा निवडणुकांच्या निकालांनंतर भाजपने दिल्लीतील मुख्यालयात विजयोत्सव साजरा केला. त्यावेळी बोलताना मोदींनी विरोधकांना लक्ष्य केले. भ्रष्टाचाराविरोधात आम्ही देत असलेल्या लढ्याला जनतेचा पाठिंबा असल्याचे निकालांतून स्पष्ट होते.
केंद्रातील आमच्या सरकारकडून केला जाणारा विकास आणि जनता यांच्यामध्ये कुणी येऊ नये. अन्यथा, जनता त्यांना हटवेल, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.