पुणे – देशातील 5 राज्यांची निवडणुक नोव्हेंबर महिन्यात पार पडली. त्यापैकी चार राज्यांचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये तेलंगना वगळता छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेशात भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. देशभरात भाजपच्या नेत्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. अशातच कर्नाटकचे माजी मंत्री तथा राज्य भाजप प्रेदश उपाध्यक्ष मलिकय्या गुत्तेदार यांनी पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन पूजा अर्चना केली.
मलिकय्या म्हणाले, देशातील जनतेने लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांवर विश्वास दाखवून भाजपाला प्रचंड बहुमताने निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत मोदी सरकार 400 पेक्षा जास्त खासदार निवडून आणेल आणि केंद्रात मजबूत सरकार स्थापन करेल. भाजप सरकार देशाची अर्थव्यवस्था जगात 3ऱ्या क्रमांकावर नेईल, असा विश्वास व्यक्त केला.
रात्री 9 वाजता असे होते निकालाचे आकडे –
तेलंगणा (119) – भाजप 8, काॅंग्रेस 64, बीआरएस 39, एमआयएम 8
मध्य प्रदेश (230) – भाजप 164, काॅंग्रेस 65, इतर 1
राजस्थान (199) – भाजप 115, काॅंग्रेस 69, बीएसपी 2, इतर 11
छत्तीसगड (90) – भाजप 54, काॅंग्रेस 35, इतर 01