Shantigiri Maharaj Nomination। लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. मात्र अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीतील काही जागांचा तिढा सुटत नाही. दरम्यान, नाशिक लोकसभा मतदार संघातुन एक मोठी बातमी समोर येत आहे. एवढे दिवस अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे म्हणणारे शांतीगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना शिंदेगटाकडून अर्ज दाखल केलाय.
शांतीगिरी महाराज हे नाशिकमधून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याची माहिती होती. त्यांनी आज गोदाघाट येथे आपल्या भक्त परिवारासह जोरदार शक्ती प्रदर्शन केले. त्यानंतर ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.
शांतीगिरी महाराज महायुतीचे उमेदवार ? Shantigiri Maharaj Nomination।
मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यांच्या या कृतीमुळं नाशकात मोठी खळबळ उडालीय. अद्याप महायुतीकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा झालेली नाही. मात्र शांतीगिरी महाराज हे महायुतीचे उमेदवार असणार का? याबाबत आता सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
शांतीगिरी महाराजांना अद्याप एबी फॉर्म नाही Shantigiri Maharaj Nomination।
मात्र अर्जासोबत महाराजांकडून एबी फॉर्म जोडण्यात आला नाही. महायुतीचा उमेदवार कोण? अशी चर्चा सुरू असतानाच स्वामी शांतिगिरी महाराज यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या नावाने अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शांतीगिरी महाराज यांनी यापूर्वी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. शांतीगिरी महाराज यांनी एकूण चार अर्ज घेतले आहेत. आज दुसरा अर्ज भरण्यात आला आहे.
हेही वाचा
पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्रात 2 दिवसात सहा सभा; कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या…