खडकी शिक्षण संस्थेच्या वतीने खडकी, बोपोडी, दापोडी, विश्रांतवाडी, शिवाजीनगर, येरवडा, या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे . या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चित्रकला,हॉकी,फुटबॉल,नेमबाजी,क्रिकेट, सारखे खेळ, योगासने रामायण कथा, भारतीय ज्ञानपरंपरा,रेडिओ, कुंडी भरण, सांस्कृतिक तसेच जुन्या कागदापासून हात मागाचा कागद तयार करणे, सोलर लॅम्प तयार करणे, विज्ञान मनोरंजनातून शिकवणे ,व मोबाईल पासून काही तास दूर ठेवणे असे नानाविध प्रकार शिकवले जात आहेत.
यासाठी आज खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण कुमार गोयल यांनी भेट दिली यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी,छोट्या गोष्टींमधून माणूस कसा मोठा होतो!! याचे उदाहरण दिले त्याचबरोबर मी याच शिक्षण संस्थेमध्ये राहण्याचा मोठा झालो आणि आज कोहिनूर ग्रुपचा अध्यक्ष आहे त्याचा प्रवास त्यांनी सांगितला अर्थात माणसातील कोहिनूर होणे कसं गरजेचं असतं हे त्यांनी यावेळी प्रतिपादन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली विद्यार्थ्यांच्या अनेक उत्सुकता होत्या त्यांची जिज्ञासा त्यांनी ऐकून घेतले तसेच विद्यार्थ्यांना आयुष्यात मोठ्या होण्यासाठी छोट्या गोष्टींना महत्त्व द्या हे सांगितले स्वप्न मोठे पहा पण ती करत असताना छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका ?
यावेळी संस्था सचिव आनंद छाजेड . डॉ काशिनाथ देवधर, प्राचार्य संजय चाकणे श्री स्वामी राज भिसे ,झांबरे, वाघ ,लोणकर ,प्रा काकडे, हजारे, श्रीमती बरेलू श्रीमती माकर व इतर सर्व स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता या शिबिरात एकूण 250 विद्यार्थी सहभागी झाले असून विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या आहेत