पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या (दि. २९) सायंकाळी लष्कर भागातील रेसकोर्स मैदानावर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर या भागात होणारी गर्दी विचारात घेता दुपारनंतर परिसरातील काही रस्ते बंद ठेवण्यात आले असून, काही रस्त्यांवरील वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
रेसकोर्स परिसरामधील पाणी टाकी ते टर्फ क्लब चौक रस्त्यावर दुहेरी वाहतूक करण्यात येत आहे, तर टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार ते टर्फ क्लब चौक रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे. सोलापूर रोडवरील अर्जुन रोड जं. ते टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार हा रस्ता बंद करण्यात येत आहे. बिशप स्कूल सर्कल ते टर्फ क्लब चौक रस्ता बंद राहील. या मार्गावरील वाहनधारकांसाठी मम्मादेवी जंक्शन येथून व बेऊर रोड जंक्शन येथून इच्छितस्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार्या रस्त्यांमध्ये गोळीबार मैदान ते भैरोबानाला (सोलापूर रोड) याचा समावेश असून, लुल्लानगर येथून पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. भैरोबानाला ते गोळीबार मैदान चौक (सोलापूर रोड) यासाठी भैरोबानाला ते लुल्लानगर हा पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. मोरओढा ते मैरोबानाला (एम्प्रेस गार्डन रोड) या मार्गावरील वाहनधारकांना मोरओढा घोरपडी रेल्वेगेट – बी.टी. कवडे रोडने इच्छितस्थळी, तर वॉर मेमोरीयल ते घोरपडी ते डोबारवाडी मार्गे बी. टी. कवडे रोडने इच्छितस्थळी जाता येईल.
भैरोबानाला ते मोरओढा या मार्गासाठी पर्यायी मार्ग बी.टी. कवडे जंक्शन ते बी.टी. कवडे रोडने उड्डाणपुलावरुन इच्छितस्थळी जाता येणार आहे. मोर ओढा ते मम्मादेवी (काहुन रोड जंक्शन बेऊर रोड मार्गे) मार्गावरील वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग मोरओढा सदन कमांड कॉन्सिल हॉल ब्लू नाईल मार्गे इच्छितस्थळी जाता येणार आहे.
गोळीबार मैदान, मम्मादेवी चौक, भैरोबानाला चौक, डॉ. आंबेडकर पुतळा चौक कॅम्प, कोरेगाव पार्क जंक्श ताडीगुत्ता चौक, नोबल हॉस्पिटल वेग मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारी (दि. २९) रोजी दुपारी दोन ते रात्री दहापर्यंत वरील परिसरातून जाण्यासाठी वाहनधारकांनी बाहेरील रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
…याठिकाणी असेल पार्किंगची सुविधा
पुणे- सोलापूर सासवड रोड वरून येणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी भैरोबानाला ते वानवडी बाजार पोलीस चौकी चौकदरम्यान, वानवडी बाजार ते मम्मादेवी जंक्शन दरम्यान पार्किंग सुविधा असेल, तर पुणे- नगर, पिंपरी चिंचवड भागातून येणार्यांसाठी सर्किट हाऊस ते मोरओढा, वॉर मेमोरीयल ते घोरपडी रेल्वे गेट,
आर्मी पब्लिक स्कूल घोरपडी गाव आणि सातारा- सिंहगड व स्वारगेट परिसरामधील वाहनांसाठी बेऊर रोड जंक्शन, कोयाजी रोडअंतर्गत रस्ते, तीनतोफा चौक, बीशप स्कूल परिसरात वाहने लावता येतील. सर्व प्रकारच्या बसेससाठी रामटेकडी उड्डाण पुलावरून जाऊन हडपसर इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये पार्किंग सुविधा देण्यात आलेली आहे. सर्व व्हीव्हीआयपी यांना भैरोबानाला चौक ते आर्मी पब्लिक स्कूलदरम्यान एंम्प्रेस गार्डन येथे पार्किंग सुविधा देण्यात आली आहे.