मुंबई – सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. हा चित्रपट 21 एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. सलमान खानच्या या चित्रपटाची स्टारकास्ट जबरदस्त आहे ज्यात पूजा हेगडे, पलक तिवारी, शहनाज गिल, जस्सी गिल अशा अनेकांचा समावेश आहे. नुकतंच, पलक तिवारीने सलमान खानबद्दल असा खुलासा केला आहे की तो ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसेल.
सलमान खान त्याच्या सर्व चित्रपटांमध्ये ‘नो किसिंग पॉलिसी’चे पालन करतो. तो कधीही आपल्या अभिनेत्रीचे ऑनस्क्रीन किस घेत नाही किंवा त्याच्या चित्रपटात असे कोणतेही दृश्य ठेवत नाही. आता एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पलक तिवारीने सिद्धार्थ कननशी संवाद साधताना म्हंटले की, सलमान खानने मुलींना किसी का भाई किसी की जानच्या सेटवर पूर्ण कपडे परिधान करून येण्यासाठी सांगितले होते.
पलकने खुलासा केला की, “सलमान सरांचा नियम होता की, “माझ्या सेटवर कोणत्याही मुलीची नेकलाइन दिसू नये. सर्व मुलींनी पूर्ण कपडे परिधान केलेले पाहिजे, चांगल्या मुलींसारखे कपडे घालून यावे.” पलक पुढे म्हणाली, माझी आई श्वेता तिवारीने मला शर्ट आणि जॉगर्स घालून सेटवर जाताना पाहिले तेव्हा ती मला या कपड्यात पाहून खूप छान म्हंटली असल्याचे देखील पलकने यावेळी सांगितले.
एकंदरीतच सलमान आपल्या सेटवरील प्रत्येकाची काळजी घेत असतो असं पलकने यावेळी सांगितले.‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट एप्रिल 2023 मध्ये ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. या चित्रपटात सलमान खान नवीन कोणता धमाका करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.