मुंबई – बॉलीवूडचा दबंग सलमान खानचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट असोत वा फ्लॉप, त्याचे चाहते त्याला चित्रपटाच्या पडद्यावर पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. सलमानच्या ‘किसी का भाई, किसी की जान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरी व्यवसाय केला.आता या चित्रपटानंतर भाईजान लवकरच कतरिना कैफसोबत ‘टायगर-3’ मध्ये दमदार अॅक्शन करताना दिसणार आहे, मात्र नुकतेच साजिद नाडियाडवालाने आपण एका चित्रपटाचा सिक्वल करणार असल्याची घोषणा केली.
सत्यप्रेम की कथाचे निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी सलमान खानच्या आगामी चित्रपट ‘किक 2’ बद्दल अपडेट शेअर केले. यावेळी बोलताना साजिद म्हणाले,आता किकची संपूर्ण स्टोरी विस्ताराने सर्वांसमोर येईल.चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण झाली आहे, पण आता आम्हाला पुढील कामासाठी वेळ हवा आहे. आम्हाला हा चित्रपट मोठ्या स्केलवर बनवायचा आहे. त्यासोबत चित्रपटाच्या रिलीज डेटवर देखील लक्ष द्यायचं आहे असं नाडियाडवाला यांनी यावेळी स्पष्ट केलं.
सलमान खानच्या मोस्ट अवेटेड ‘किक 2’ या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. 2014 मध्ये सलमान खानच्या या चित्रपटाने 402 कोटींचा व्यवसाय केला होता.या चित्रपटात सलमान खानशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकी खलनायकाच्या भूमिकेत आणि रणदीप हुड्डा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला होता. जॅकलिन फर्नांडिसने ‘किक’मध्ये सलमान खानच्या प्रेयसीची भूमिका केली होती.
सर्व काही जुळून येताच किक २ चे शूटिंग सुरू होईल. सलमान खाननेही चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली आहे. आता प्रेक्षकांमध्ये तोच उत्साह परत येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. लवकरच आम्ही किक 2 ची अधिकृत घोषणा करू असं देखील नाडियाडवाला यांनी यावेळी स्पष्ट केले. एका हिंदी मनोरंजन मीडियाशी बोलताना त्यांनी आपल्या आगामी प्रोजेक्टवर भाष्य केलं.