मुंबई – बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षक ‘बिग बॉस ओटीटी’ची वाट पाहत होते. गेल्या वर्षी सुरू झालेला हा शो चांगलाच लोकप्रिय झाला होता. पहिल्या सीझनच्या विजेत्या दिव्या अग्रवाललाही या शोने खूप प्रसिद्धी दिली. त्याचबरोबर या शोचा दुसरा सीझन लवकरच सुरु होणार आहे. यावेळी हा शो अधिक खास आहे कारण यंदाचा ओटीटी सीजन देखील सलमान खान होस्ट करणार असल्याचे समजते.
टीव्हीवर मोठ्या प्रमाणात बिग बॉस शो हिट झाल्यानंतर ओटीटीवर देखील या शोला मोठा प्रतिसाद मिळाला. म्हणून प्रेक्षक देखील ओटीटीच्या दुसऱ्या सिजनची वाट पाहत होते. 17 जूनला बिग बॉस ओटीटीचा प्रीमियर पार पडणार आहे. यंदा आयपीएलचे प्रसारण करणाऱ्या जिओ सिनेमावर ‘बिग बॉस’ प्रसारित होणार आहे.
सलमान खान ओटीटीवर देखील हा शो होस्ट करणार असल्यामुळे चाहते देखील खुश झाले आहेत. सलमानला पुन्हा एकदा घरातील प्रतिस्पर्ध्यांसोबत पाहण्यासाठी प्रेक्षकही आतुर झाले आहेत. हा शो मे महिन्यातच सुरु होणार होता मात्र आयपीएलमुळे शो पुढे ढकलण्यात आल्याचे समजते.
या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार्या सेलिब्रिटींची नावे अद्याप समोर आलेली नसली तरी या शोची बरीच चर्चा आहे. टीव्ही इंडस्ट्रीसह रिजनल सिनेमातील कलाकार या शोच्या स्पर्धेमध्ये असणार आहेत. या शोचा पहिला सीझन बॉलीवूड चित्रपट निर्माता करण जोहरने होस्ट केला होता, परंतु तो प्रेक्षकांना फारसा आवडला नाही.म्हणूनच आता हा शो सलमान खान होस्ट करणार आहे.