मुंबई – अभिनेत्री झरीन खान म्हंटल कि आठवतो तिचा वीर हा पहिला चित्रपट. चित्रपटाचं ट्रेलर पाहून अनेकांना ती अभिनेत्री कतरीना कैफचं असल्याचं वाटलं होत. म्हणूनच अनेकांना वीर हा चित्रपट आजही आठवतो. सलमान खानने झरीनला वीर चित्रपटातून इंडस्ट्रीमध्ये आणलं होत. यावरूनच आता झरीनने सलमान खानचे कंटूयक केले आहे.
सलमान खान ज्याला इंडस्ट्रीत लॉन्च करतो, तो नेहमीच भाईजानची प्रशंसा करतो. आता झरीन खाननेही सलमानच्या करिअरबद्दल बोलताना त्याचे कौतुक केले.झरीन खान म्हणाली की, तिला कधीच वाटले नव्हते की ती सलमानशिवाय फिल्मी दुनियेचा भाग होऊ शकते. करिअरबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली की, चित्रपटांमध्ये येण्यासाठी तिला संघर्ष करावा लागला नाही, पण तिचा खरा संघर्ष चित्रपटात ब्रेक मिळाल्यानंतर सुरू झाला.फिल्मी बॅग्राऊंड नसल्यामुळे इंडस्ट्री कशी चालते हे समजायला वेळ लागल्याचे देखील तिने यावेळी सांगितले.
बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून झरीनची इंडस्ट्रीमध्ये ओळख आहे. झरीन 36 वर्षांची झाली असून आपल्या जन्मदिनी तिने सलमान खानचे देखील आभार मानले. सलमान शिवाय इंडस्ट्रीत येनं मुश्किल होत असही झरीनने यावेळी स्पष्ट केले. झरीनने इंडस्ट्रीमध्ये येताच अनेक सुपरहिट आणि बिग बजेट सिनेमात काम केलं.
अभिनेत्रीच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर झरीन खानने ‘हाऊसफुल 2’, ‘रेडी’ आणि ‘हेट स्टोरी 3’ मधील तिच्या दमदार अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत छाप पाडली. अभिनेत्री शेवटची 2021 मध्ये ‘हम भी अकेले तुम भी अकेले’ मध्ये दिसली होती.