मुंबई – अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) ‘बिग बॉस 14’ मुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. या शोमधील तिचा प्रेमळ आणि निरागस स्वभाव अनेकांच्या पसंती पडला. या शोनंतर तिने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसिकी जान’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या शहनाजच्या बाबत एक वाईट बातमी समोर आली आहे. शहनाज गिल हिला (Shehnaaz Gill) विषबाधा झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शहनाजला ‘थँक्यू फॉर कमिंग’ या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान विषबाधा झाली आहे. त्यानंतर तिने रुग्णालयातील एक व्हिडिओ शेअर करत तब्यतेविषयी माहिती दिली आहे. “सर्वांची वेळ येते…आता माझी वेळ आली आहे. आता माझी प्रकृती स्थिर आहे. सँडविच खाल्ल्याने मला विषबाधा झाली होती,” असे शहनाज व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओनंतर अनेकांनी शहनाजच्या प्रकृतीत लवकरात सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केली आहे.
Get well soon ShehnaazGill is in Hospital 🥺💔#ShehnaazGiIl #shehnaazkaurgill #Shehnaazians #ShehnaazKaurGiII #ShehnaazGallery pic.twitter.com/CKANiBIWex
— Asmakhan (@zoyakhan9948a) October 9, 2023
बिग बॉस फेम जस्मिन भसीनला देखील विषबाधा झाली आहे. सोशल मीडियाद्वारे तिने ही माहिती चाहत्यांना दिली आहे. दरम्यान, शहनाज गिल नुकतीच ‘थँक यू फॉर कमिंग’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण बुलानीने यांनी केले आहे. या सिनेमात शहनाजसह भूमी पेडणेकर, करण कुंद्रा, कुशा कपिला, शिबानी बेदी, डॉली सिंह हे कलाकार आहेत.