सुशील मोदींना भाजपने दिला ‘डच्चू’; नितीश कुमार म्हणाले…

पटना – नितीश कुमार यांनी आज सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार मुख्यमंत्री तर सुशील मोदी उपमुख्यमंत्री होणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती मात्र एनडीए सरकारने सुशील मोदी यांना डच्चू दिला आहे.

यावेळी एनडीएने दोन उपमुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यात सुशील मोदी यांचे नाव नाही. भाजपचे तारकिशोर प्रसाद आणि रेणू यादव यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी देखील आज पार पडला.

पत्रकारांच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना नितीश कुमार म्हणाले, ‘सुशील मोदी यांना उपमुख्यमंत्री न बनवण्याचा निर्णय भाजपचा आहे. याबाबत तुम्ही भाजपला विचारायला हवे. आमची युती आहे. आम्ही एकमेकांसोबत मिळून काम करत आहोत आणि मिळून काम करणार.’ असे नितीश कुमार म्हणाले.

दरम्यान, नितीश कुमार यांनी आज सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत इतर 14 मंत्र्यांचा देखील शपथविधी सोहळा पार पडला. यात भाजपचे 7, जेडीयूचे 5, व्हीआयपी आणि हम पक्षातील एक-एक मंत्र्यांच्या समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.