नवी दिल्ली – काँग्रसे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार मनीष तिवारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आज दुपारी माझा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. काल रात्री 2 वाजण्याच्या सुमारास सौम्य तापामुळे माझी झोपमोड झाली. त्यानंतर सकाळी उठून सर्वात आधी कोरोनाची चाचणी केली. एकाच वेळी दोन चाचण्या केल्या गेल्या. त्यात माझा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला असून मला कोणतीही लक्षणं नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असा सल्ला त्यांनी दिला आहे.
I have tested positive for COVID -19 today afternoon. I got up with mild fever around 2 AM last night. Got myself tested first thing in the morning.Two parallel Tests. No other symptoms so far.All those who have been in contact with me over the past few days are advised caution.
— Manish Tewari (@ManishTewari) November 16, 2020
दरम्यान, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल हे देखील गेल्या महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांना गुरुग्राममध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, आता ते आयसीयूमध्ये आहेत. पण अहमद पटेल यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी रविवारी सांगितले आहे.