बारामती – दिवाळीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र जमले आणि यावेळी दिवाळीतील महत्वाचे पर्व असणारा पाडव्याचा सण आज पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला, अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिय सुळे यांनी सोशल माध्यमाव्दारे दिली आहे.
https://www.facebook.com/watch/?v=398095928209156
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसंच संपूर्ण पवार कुटुंबातील सदस्यांच्या एकत्रित उपस्थितीत बारामतीत परंपरेनुसार दरवर्षी साजरा होणारा दिवाळीचा सण तसेच दिवाळी पाडव्याला होणाऱ्या हितचिंतकांच्या स्नेहभेटी, शुभेच्छांचा पारंपरिक कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी दिली होती.
तसेच कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतकांना गोविंदबागेत न येता यंदाच्या वर्षी भेटीगाठी, दिवाळी डिजिटल पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे यंदा कार्यकर्त्याच्या भेटीगाठी न घेता फक्त पवार कुटुंबीयानी एकत्र येत दिवाळी पाडवा साजरा केला.