खासदार सुप्रिया सुळे पदाधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणात गौरवोद्गार
पिरंगुट: मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संघटनात्मक काम आदर्श असून, तोही एक मुळशी पॅटर्न बनला आहे. पक्षाचा हा मुळशी पॅटर्न प्रथम बारामती लोकसभा मतदारसंघात राबविणार असून त्यानंतर तो राज्यभर राबविणार आहे. बूथ कमिटी अध्यक्षांनी मतदारांची नोंदणी व माहिती अद्ययावत ठेवून अधिकाधिक व अचूक नोंदणी घ्यावी, असे प्रतिपादन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
पिरंगुट (ता. मुळशी) येथील सुरभी बॅंक्वेट हॉलमध्ये तालुक्यातील पदाधिकारी व बूथ कमिटी अध्यक्षांसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षणात त्या बोलत होत्या. यावेळी तालुक्यातील 203 बूथ कमिट्यांच्या अध्यक्षांना स्वतंत्र खुर्ची राखीव ठेवून त्यात त्यांना बसविण्यात आले होते. बुथ अध्यक्षांच्या या भरगच्च उपस्थितीमुळे बूथ पातळीवरील पक्षाच्या कामाला संघटनात्मक पातळीवरील गती मिळणार आहे.
या प्रशिक्षणामध्ये मतदारांची नोंदणी, त्यांचे सदस्यांची नेमणूक, ऍपची सविस्तर माहिती, मतदारांची तपशीलवार माहिती आदींची नोंद आदींबाबत माहिती देण्यात आली. या ऍपच्या माध्यमातून बूथ पातळी ते राज्यपातळीपर्यंत मतदारांची तसेच पदाधिकाऱ्य्ांची माहिती उपलब्ध होणार आहे.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, सुनील चांदेरे, सविता दगडे, शांताराम इंगवले, बाबा कंधारे, राधिका कोंढरे, दगडूकाका करंजावणे, अंकुश मोरे, बाबाजी शेळके, महादेव गोळे, राहुल पवळे, अमित कंधारे, प्रसन्न ओझरकर, भिकाजी मारणे, अस्मिता मारणे, दीपाली कोकरे, सुनील वाडकर, सागर साखरे, कोमल साखरे, भानुदास गोळे, संतोष पवळे, भाऊ केदारी, सुभाष माझिरे, जितेंद्र इंगवले, प्रशांत रानवडे, रवींद्र गोळे, नेहा साठे, तात्या देवकर, चंद्रकांत भिंगारे, लक्ष्मण निकटे, सचिन पवळे, चंद्रकांत निकटे, चेतन गोळे, आदित्य गोळे, शेखर शिंदे, गणेश पवळे, बापू पवळे आदी उपस्थित होते.