नाशिक : नाशिकमध्ये आतापर्यंत एकही मृत्यू झालेला नव्हता परंतु बुधवारी मालेगांव येथे कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. जेथे जेथे रुग्ण सापडतील तेथे संपूर्ण चेकअप करण्यात येईल व परिसराची पाहणी करुन कारवाई केली जाईल, असे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी सांगितले.
मालेगावात दुर्देवाने कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. चार ते पाच जण अजुन संशयित रुग्ण सापडले आहे. जीवन हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोना बाधिताना शासकीय रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील इतर रुग्णांचीही सोय केली जाईल.
हिंदू-मुस्लिम, शीख, इसाई कोणीही असो या सर्वांना त्या-त्या धर्मगुरुंनी आपआपल्या समाजाला अपिल केले आहे की आपण आपल्या घरात बसुन पुजा अर्चा करा. एकत्रित येऊ नका त्यामुळे कोरोनाचा धोका वाढतो आहे. आपण ऐकले नाही तर हे हाताच्या बाहेर जाईल. लोकांनी सूचना ऐकल्या नाही तर मंदीर, मस्जिद, भाजीबाजारात मोठ्या प्रमाणात एकत्र आलात तर मोठी अडचण निर्माण होईल.
संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आवाहन केले की, शासन व पोलीस प्रशासनास मदत करा. आपल्या आजुबाजुस एखादा रुग्ण आढळून आला तर प्रशासनास माहिती द्या.