Narendra Modi । पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी काम, निर्णय आणि राजकारण या आघाडीवर सर्वसामान्यांपासून खास व्यक्तींपर्यंत सर्वांनाच चकित करतात. 2014 मध्ये पहिल्यांदा केंद्रात सत्तेत आल्यानंतर पंतप्रधानांनी याची सुरुवात केली. त्यानंतर एका छोट्याशा निर्णयाने पंतप्रधानांनी संपूर्ण यंत्रणा हादरवून सोडली. वृत्तसंस्था ‘एएनआय’ वर प्रसारित झालेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ही कथा कथन करताना दिसले.
सार्क देशांच्या नेत्यांना शपथविधीचे निमंत्रण Narendra Modi ।
गुजरातचे भाजपचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मुलाखतीत १० वर्षांच्या कामाची सविस्तर माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, “वर्ष 2014 मध्ये माझ्या शपथविधीचा कार्यक्रम होता, ज्यासाठी मी ठरवले होते की दक्षिण आशियाई प्रादेशिक सहयोग संघटना (सार्क) देशाच्या नेत्यांना बोलावले पाहिजे. त्यातच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधकांनी माझ्यावर आरोप केला होता कि मोदी तर एका राज्यातून आले आहेत त्यांना परराष्ट्र धोरण काय माहिती हे तर देशाला बुडवणारे आहेत. त्यामुळे मी विचार केला कि आपल्या एकाच कामातून विरोधकांना उत्तर देऊ म्हणून मी तो निर्णय घेतला.
#WATCH | PM Modi’s big pre-poll interview | BJP’s Mission South, Electoral Bonds, ED action | Lok Sabha Elections 2024#PMModi #SmitaPrakash #LokSabhaElection2024
Premiering now: https://t.co/UZGIEI4fkY
— ANI (@ANI) April 15, 2024
पंतप्रधानांच्या म्हणण्यानुसार, “मी सार्क देशांच्या नेत्यांना बोलावले होते आणि त्यांना येथे बोलावण्यासाठी बॅक चॅनेलद्वारे संमती घेतली होती. सर्वजण आले. माझा शपथविधी झाला आणि तोपर्यंत आमच्या सरकारचा परराष्ट्र मंत्री कोणीही नव्हते. या सर्व गोष्टींबद्दल मला माहिती नव्हती आणि जेव्हा मी हैदराबाद हाऊसमध्ये गेलो तेव्हा मला परदेशी पाहुण्यांना कसे भेटायचे याबद्दल माहिती देण्यात आली.
एका कृतीने माझ्यासाठी सर्व दरवाजे उघडले Narendra Modi ।
या घटनेचे वर्णन करताना नरेंद्र मोदी पुढे म्हणाले – जेव्हा सार्क देशांच्या नेत्यांच्या आगमनाची वेळ आली तेव्हा मी त्यांना स्वागत करण्यासाठी बाहेर जाईन असे सांगितले… हे ऐकून संपूर्ण यंत्रणा हादरली. आपले पंतप्रधान आपल्याला पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी प्रवेश द्वारावर जातील. असे त्यांना वाटू लागले. माझ्या प्रोटोकॉलच्या जगासाठी, तो पहिलाच दिवस आश्चर्यकारक होता. त्या एका कृतीने माझ्यासाठी सर्व दरवाजे उघडले. “प्रोटोकॉलचे बंधन न ठेवता कामगिरीवर लक्ष केंद्रित करून मी मुत्सद्देगिरीची पातळी बदलण्याचा प्रयत्न केला आणि मी यात यशस्वी झालो.” असे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा
“मला अजून खूप काम करायचं, आगामी काळात मोठी स्वप्न पूर्ण होणार…”; PM मोदींचा 25 वर्षांचा प्लॅन तयार