Narendra Modi | Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 चा बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दि. 16 मार्च रोजी पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. तसेच मतमोजणी कधी होणार आहे हे देखील सांगितलं.
देशात 7 टप्प्यांत लोकसभा निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिल, दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे, पाचवा टप्पा 20 मे, सहावा टप्पा 25 मे आणि सातवा टप्पा 1 जूनला पूर्ण होणार आहे. । Narendra Modi | Lok Sabha Election 2024
लोकसभा निकालाची घोषणा 4 जूनला होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी अजेंडा सेट केला असून, ‘अबकी बार 400 पार, तीसरी बार मोदी सरकार’ असा नारा दिला आहे. आणि त्याच अनुषंगाने सध्या भाजप तयारीला लागला आहे.
दरम्यान, अश्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका खास मुलाखतीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “ मी 2047 ला डोळ्यासमोर ठेवून काम केले. यासाठी मी सर्वांकडून सल्ला मागितला.
विद्यापीठ संघटना, विद्यार्थी सर्वांचे सल्ले घेतले. एआयची मदत घेतली. अधिकाऱ्यांसोबत बसलो. पुढच्या 25 वर्षात भारत कसा हवाय? यावर 2-3 तास चर्चा करायचो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीत ही माहिती दिली.
मागच्या 2 वर्षांपासून मी 2047 व्हिजन घेऊन मी काम करतोय. यात मला अजून खूप काम करायचं. मी डॉक्यूमेंट बनवतोय. ते माझं व्हिजन आहे. हे 15-20 लाख लोकांचं मत आहे. राज्यांनी यावर काम करावं.
हे काम भाजपचं नाही तर संपूर्ण देशाचं आहे. यानंतर मी नीती आयोगाची बैठक बोलवेन, असे ते म्हणाले. जनतेचा विश्वास माझ्यासाठी खूप महत्वाचा असल्याचे ते म्हणाले. । Narendra Modi | Lok Sabha Election 2024
पीएम मोदी म्हणाले की, 2019 मध्येही मी 100 दिवसांचे काम घेऊन निवडणुकीत गेलो होतो, मी कलम 370, तिहेरी तलाकसह अनेक कामे केली आहेत, सरकारमध्ये आल्यानंतर पुढील 100 दिवसांत मी कोणते काम करायचे याचे आधीच नियोजन करत आहे. असं ते म्हणाले.
‘काँग्रेसचं पाच-सहा दशकांचं काम हे त्यांच्यासाठी एक मोठं मैदान’
“2024 चा क्रम हा निवडणुकीच्या दृष्टीकोनाने आलेला क्रम आहे. देशाच्या समोर एक संधी आहे. एक काँग्रेस सरकारचं धोरण आणि भाजप सरकारचं धोरण, त्यांचं पाच-सहा दशकांचं काम हे त्यांच्यासाठी एक मोठं मैदान आहे.
माझं काम तर फक्त 10 वर्षांचं आहे. कोणत्याही क्षेत्राबद्दल तुलना करा. काही कमी असेल तरी आमच्या प्रयत्नांमध्ये काहीच कमी राहणार नाही”, असं दावा नरेंद्र मोदी यांनी केला.
ही बातमी नक्की वाचा….