मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्व करण्याच्या शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नाराज असल्याचे वृत्त होते. परंतु, युपीएमध्ये शरद पवारांच्या नावाला कोणाचा विरोध असल्याची माहिती नाही, असे म्हणाले आहेत.
संजय राऊत म्हणाले कि, काँग्रेसमध्ये नाराजी वैगेरे काही नाही. तर युपीए अधिक मजबूत होण्यासाठी ही काँग्रेस पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची भूमिका आहे. सोनिया गांधीचीही तशी भूमिका असू शकते.सोनिया गांधींनी प्रदीर्घ काळ युपीएचे नेतृत्व खंबीरपणे केले आहे, पण सध्या त्यांची प्रकृती ठीक नसते. देशात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत अशावेळी युपीएचे नेतृत्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावे ही अनेक राज्यांमधील प्रादेशिक पक्षांची मागणी आहे. आज युपीए अत्यंत विकलांग अवस्थेत आहे.
दरम्यान संजय राऊत यांच्या विधानावर काँग्रेस नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून टीका केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
नाना पटोले म्हणाले,’ ज्या गोष्टीशी संबंध नाही त्यावर संजय राऊतांनी चर्चा करु नये इतकाच आमचा सल्ला आहे, युपीएचं नेतृत्व कोणी करावं हे युपीएच्या सदस्यांनी ठरवलं आहे. मी परवाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ते शरद पवार साहेबांचे प्रवक्ते आहेत का असा उल्लेख केला होता.’ असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.