‘अनिल देशमुखांवर तोंड उघडू नये म्हणून वरिष्ठांचा दबाब’

मुंबई – मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपामुळे संपूर्ण देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. यानंतर अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्वरित चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासंबंधीचे एक पत्र अनिल देशमुखांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकरवर टीकास्त्र सोडले आहे.

अनिल देशमुखांकडून २१ तारखेला पत्र लिहून घेतले गेले. ते ४ दिवस प्रलंबित ठेऊन २४ तारखेला प्रसिद्ध केले. १०० कोटींच्या वसुलीचे आरोप व पत्रात व्हॉट्सअॅप -एसएमएसची भाषा. पुन्हा एकदा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न? अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाब..नाही तर…?? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, “दूध का दूध, पानी का पानी” करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते…, असे ट्विट अनिल देशमुख यांनी केले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.