“द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ या आपल्या आगामी सिनेमाची तयारी म्हणून विकी कौशलने चक्क धनुर्विद्येचा सराव करायला सुरुवात केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये तो आर्चरी बोर्डच्या समोर उभा आहे. त्याच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे आणि तो नेमबाजीचा सराव करतो आहे.
View this post on Instagram
ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेमध्ये धनुर्विद्येचे जसे धनुष्य बघायला मिळते, तसे धनुष्य विकीच्या हातात आहे. त्याने “नी गार्ड’ही बांधले आहे. टी शर्ट आणि शॉर्ट घातलेला पाठमोरा विकी कौशल समोरच्या आर्चरी बोर्डाकडे बघत उभा आहे, असे या फोटोमध्ये दिसते आहे.
View this post on Instagram
“द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ या सिनेमाच्या तयारीसाठी नेमबाजीचा सराव करत असल्याचे विकीने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. कष्टाला पर्याय नाही. त्यासाठी वेळ द्यायलाच पाहिजे. त्याशिवाय फळ मिळवणे म्हणजे मायक्रोवेव्ह नाही, असे विकीने म्हटले आहे.
View this post on Instagram
त्याच्या या कॅप्शनला आणि फोटोला चक्क 3 लाख लाईक मिळाले आहेत. अश्वत्थामाच्या रोल व्यतिरिक्त विकी कौशलकडे “सरदार उधम सिंग’, “तख्त’ आणि फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा बायोपिक आहे.
View this post on Instagram