नगर -जिल्ह्यात आज 379 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 61 हजार 244 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.19 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजलेपासून आज सायंकाळी सहावाजेपर्यंत रुग्णसंख्येत 263 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 1 हजार 494 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 41 खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 61 आणि अँटिजेन चाचणीत 161 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 29, जामखेड 1, कोपरगाव 1, नगर ग्रामीण 5, पारनेर 1, शेवगाव 1, श्रीगोंदा 1, श्रीरामपूर 1 आणि इतर जिल्हा 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 25, अकोले 6, कर्जत 1, नगर ग्रामीण 4, नेवासे 3, पारनेर 4, पाथर्डी 2, राहाता 3, राहुरी 3, संगमनेर 4, शेवगाव 2, श्रीगोंदा 2, श्रीरामपूर 1, कॅन्टोन्मेंट 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज जिल्ह्यात 161 जण बाधित आढळून आले. यामध्ये मनपा 7, अकोले 7, जामखेड 7, कर्जत 5, कोपरगाव 11, नगर ग्रामीण 2, नेवासे 6, पारनेर 7, पाथर्डी 17, राहाता 4, राहुरी 10, संगमनेर 33, शेवगाव 7, श्रीगोंदा 12, श्रीरामपूर 26, अशा रुग्णांचा समावेश आहे.