श्रीनगर – काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या जवानांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. या चकमकीत सुरक्षा दलाचे दोन जवानही जखमी झाले आहेत. काल पासून तिथे ही चकमक सुरू आहे. (Two terrorists dead say officials, 2 Army personnel injured as gunbattle resumes in J&K’s Baramulla)
उत्तर काश्मीरमधील सोपोर भागातील चेक मोहल्ला नौपोरा येथे गुरुवारी चकमक सुरू झाली. रात्रीच्या शांततेनंतर, शुक्रवारी सकाळी पुन्हा दोन्ही बाजूंनी गोळीबाराच्या फैरी झडल्या. या चकमकीत आत्तापर्यंत दोन दहशतवादी मारले गेले आहेत.
गोळीबारात जखमी झालेल्या दोन लष्करी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यात त्या परिसरातील एक नागरीकही जखमी झाला आहे. या परिसरात नेमके किती दहशतवादी लपले आहेत याची माहिती अजून मिळालेली नाही, पण त्यांना येथून हुसकाऊन लावण्याची मोहीम सुरक्षा दलांनी हाती घेतली आहे.