मुंबई: आपल्या मंजुळ स्वरांची मोहिनी टाकत अख्ख्या जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित लता मंगेशकर यांचे निधन झाले त्या 93 वर्षांच्या होत्या. शेकडो हिंदी चित्रपट आणि सुमारे 36 देश विदेशी भाषांमध्ये आपला स्वरसाज उमटवला. दरम्यान, लतादीदींच्या निधनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील शोक व्यक्त केले आहे. शरद पवार यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, लता मंगेशकर यांचं निधनानंतर 2 दिवसांचा दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्यावर काय करण्यात येते?
-ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात येतो.
-राष्ट्रध्वज किती दिवस या स्थितीत राहील याचा निर्णय फक्त राष्ट्रपती घेतात.
-सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात येते.
-शासकीय सन्मान प्राप्त व्यक्तीचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळण्यात येते.
-अंत्यसंस्कारावेळी बंदुकांची सलामी देण्यात येते.