मुंबई – आपल्या मंजुळ स्वरांची मोहिनी टाकत अख्ख्या जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित ‘लता मंगेशकर’ यांचे निधन झाले त्या 93 वर्षांच्या होत्या. शेकडो हिंदी चित्रपट आणि सुमारे 36 देश विदेशी भाषांमध्ये आपला स्वरसाज उमटवला. त्यांच्या गाण्यांनी नेहमीच श्रोत्यांच्या कानांना मंत्रमुग्ध केलं असून, आज लता मंगेशकर नावाचं पर्व संपलं.
दरम्यान, दुपारी 12 वाजता लता दीदींचं पार्थिव त्यांच्या पेडर रोडवरच्या त्यांच्या घरात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. लतादिदींवर मुंबईतल्या शिवाजीपार्कवर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.