उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे यांची निवड
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांची निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे यांची निवड झाली आहे. मोहोळ यांनी प्रकाश कदम यांचा पराभव केला. निवडणुकीमध्ये शिवसेनेने राष्ट्रवादी, कॉग्रेस आघाडीला मतदान केले होते. मात्र तरीही त्यांचा उमेदवार निवडून येऊ शकला नाही.
पुण्याचे महापौर खुल्या गटासाठी राखीव झाले होते. त्यामुळे महापौर म्हणून कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता पक्षामध्ये होती. भारतीय जनता पक्षाच्या शहराच्या ‘कोअर कमिटी’च्या बैठकीत विविध नावांवर चर्चा झाली. त्यातून, पक्ष नेतृत्वाकडे काही मोजक्या नावांची शिफारस करण्यात आली होती. त्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचे पारडे सर्वांत जड होते. आता त्यांची महापौरपदी निवड करण्यात आली आहे.