#NZvENG 1st Test : दुस-या दिवसअखेर न्यूझीलंड ४ बाद १४४

माउंट माँगिन्यूई : इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुस-या दिवसअखेर पहिल्या डावात न्यूझीलंडने ४ बाद १४४ धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. न्यूझीलंड अजूनही इंग्लंडच्या पहिल्या डावाच्या धावसंख्येच्या २०९ धावांनी पिछाडीवर आहे. दुस-या दिवसांचा खेळ थांबला तेव्हा हेनरी निकोल्स नाबाद २६ आणि बीजे वाॅटलिंग नाबाद ६ धावांवर खेळत होते.

न्यूझीलंडचे सलामीवीर झटपट बाद झाले. टाॅम लाथम ०८ तर जीत रावल १९ धावांवर बाद झाला. त्यानंतर केन विलियमसनने ५१ तर राॅस टेलरने २५ धावांची खेळी करत न्यूझीलंडचा डाव सावरला. न्यूझीलंडकडून सैम करनने २ तर जैक लीच आणि बेन स्टोक्सने प्रत्येकी १ गडी बाद केला.

दुस-या दिवशी कालच्या ४ बाद २४१ वरून पुढे खेळताना इंग्लंडचा पहिला डाव ३५३ धावसंख्येवर संपुष्टात आला. इंग्लंडकडून पहिल्या डावात फलंदाजीत बेन स्टोक्सने सर्वाधिक ९१ तर जो डेनलीने ७४, राॅरी बर्न्सने ५२ तर जोस बटलरने ४३ धावा केल्या. न्यूझीलंडकडून पहिल्या डावात गोलंदाजीत टीम साउदीने सर्वाधिक ४ तर नील वैगनरने ३ , काॅलिन डी ग्रैंडहोमने २ आणि ट्रेंट बोल्टने १ गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक :

न्यूझीलंड : पहिला डाव – ५१ षटकांत ४ बाद १४४
बीजे वाॅटलिंग नाबाद ०६, हेनरी निकोल्स खेळत आहे २६.

इंग्लंड : पहिला डाव : सर्वबाद ३५३.

Leave A Reply

Your email address will not be published.