मुंबई – पश्चिम बंगालमधील राणावत रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचा आवाजातील गाणे गाणारी रानू मंडलचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता. रानू मंडलच्या या व्हिडीओने तिला एका रात्रीत सुपरस्टार बनविले.
दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर सामाजिक माध्यमांमधून ट्रोलिंग सुरु होती. तिच्या न्यू लुकमुळे चांगलेच ट्रोल केले जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या फोटोमागचं सत्य समोर आलं आहे. रानूच्या त्या फोटोमध्ये छेडछाड करुन त्यांचा चेहरा भडक करण्यात आला होता. याबाबत स्वतःहा रानू मंडल यांचा मेकअप आर्टिस्ट संध्या यांनी स्पष्टीकरण दिले.
मेकअप आर्टिस्ट संध्या आपल्या इंन्टाग्रामवर खरा फोटो शेअर करीत याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, कोणीतरी ट्रोल करण्याच्या इराद्याने रानूचा फोटो एडिट केल्याचं समजतंय. विनोद करणं एखाद्या सीमेपर्यंत ठीक आहे पण त्याने जर एखाद्याच्या भावना दुखावत असतील तर ते चूक आहे, असं मेकअप आर्टिस्ट संध्या म्हणाली आहे.