सातारा, (प्रतिनिधी) – पोलीस मुख्यालयासमोर आणि सातारा शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस क्लबमधून पोलीस निरीक्षक अशोक पाटील यांचा मोबाइल चोरट्याने बुधवारी (दि. 1) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास चोरून नेला.
याप्रकरणी पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक अशोक पाटील हे सध्या नियंत्रण कक्षात नेमणुकीस असून, पोलीस मुख्यालयासमोर पोलीस ऑफिसर क्लबमध्ये रहात आहेत.
तेथील खोली क्र. 3 मधून पाटील यांचा 25 हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरट्याने लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सातारा परिसरात दुचाकी चोऱ्या व घरफोड्यांचे प्रमाण वाढले असताना, एका पोलीस अधिकाऱ्यालाच चोरट्यांनी दणका दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.