मुंबईमध्ये 17 हजार पदांची मेगा भरती

मुंबई – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत विविध कामे करणाऱ्या कंत्राटदार यांच्याकडील सुमारे 17 हजार पदांच्या भरतीसाठी कौशल्य विकास विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 2 हजार 923 पदांची भरती केली जाणार आहे.

यासाठी ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाने 6 ते 8 जुलै 2020 या कालावधीत तर मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या कार्यालयांनी 8 ते 12 जुलै 2020 या कालावधीत कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

सद्यस्थितीत करोनाच्या संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई व राज्यातील इतर जिल्ह्यातून बरेचशे कुशल, अर्धकुशल, अकुशल कामगार स्थलांतरीत झाले आहेत. परंतु राज्याच्या विकासासाठी राज्यातील पायाभूत प्रकल्प सुरू राहण्याची आवश्‍यकता आहे.

या अनुषंगाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे अंतर्गत कामे करणाऱ्या कंत्राटदार यांचेकडे सुमारे 17 हजार गवंडी, सुतारकाम, फिटर (स्टील फिक्‍सींग करणारे), फिटर (बार बेंडिंग व फिक्‍सिंग करणारे), वेल्डर, इलेक्‍ट्रिशियन व वायरमन अशा शैक्षणिक पात्रतेच्या कुशल आणि अकुशल कामगार (श्रमिक) मनुष्यबळाची आवश्‍यकता आहे. यापैकी ऑनलाइन मेळाव्याच्या पहिल्या टप्प्यात 2 हजार 923 पदे भरली जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.