Maharashtra State Interim Budget 2024 : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तब्बल ८ हजार ६०९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केल्या. यात शेतकऱ्यांच्या भरपाईकरिता सर्वाधिक तरतूद करण्यात आली. याशिवाय पहिल्या दिवशी तीन विधयके सादर करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका सुधारणा विधेयक 2024 मांडले. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक 2024 आणि सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2024 मांडले. | Maharashtra State Interim Budget 2024
अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केलेल्या ८ हजार ६०९.१७ कोटींच्या पुरवणी मागण्यांपैकी ५ हजार ६६५.४८ कोटींच्या अनिवार्य, २ हजार ९४६.६९ कोटींच्या मागण्या या विविध उपक्रमांतर्गत आणि १७ कोटींच्या रकमा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांसाठी अर्थसहायय उपलब्ध कोण्याच्या अनुषंगाने आहेत. ८ हजार ६०९.१७ कोटींच्या स्थूल पुरवणी मागण्या असल्या, तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा ६ हजार ५९१.४५ कोटी इतका आहे. हा निव्वळ भार सहन करण्यासाठी कोणतीही अतिरिक्त साधनसंपत्ती तूर्तास उपलब्ध नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. | Maharashtra State Interim Budget 2024
विभागनिहाय तरतूद
वित्त विभाग १८७१.६३
महसूल व वन विभाग १७९८.५८
उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग १३७७.४९
विधी व न्याय विभाग १३२८.८७
नगर विकास विभाग ११७६.४२
नियोजन विभाग ४७६.२७
गृह विभाग २७८.८४
कृषी व पदुम विभाग २०४.७६
सार्वजनिक बांधकाम विभाग ९५.४८
महत्त्वाच्या पुरवणी मागण्या
अवकाळी पाउस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे बाधित पिकांच्या नुकसानीकरीता – २२१०.३० कोटी
महावितरण कंपनीच्या कृषिपंप, यंत्रमाग व वस्त्रोद्योग ग्राहकांना शासनाकडून अनुदान – २०३१.१५ कोटी
राष्ट्रीय आवास बँकेकडून नागरी पायाभूत विकास निधी अंतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना कर्ज – २०१९.१८ कोटी
मुंबई मेट्रो लाइन ३, नागपूर मेट्रो लाईन व पुणे मेट्रो लाईन यांच्या कर्जाच्या थकबाकीची परतफेड – १४३८.७८ कोटी