हडपसर – सन्मित्र सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर आणि माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखालील सन्मित्र प्रगती पॅनलने निर्विवाद वर्चस्व स्थापन केले. या पॅनलचे सर्व १७ उमेदवार विजयी झाले आहेत.
प्रगती पॅनलला मिळालेला हा विजय हा सभासद यांनी दाखवलेल्या विश्वासाचा विजय असल्याचे बाळासाहेब शिवरकर व जगन्नाथ शेवाळे यांनी सांगितले. सोमवारी महर्षी नगर कटारे हायस्कूल येथे मतमोजणी पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी काम पाहिले.
‘सन्मित्र प्रगती’चे विजयी झालेले उमेदवार व कंसात मिळालेली मते सर्वसाधारण मतदारसंघातून विजय रामचंद्र कोद्रे -(३३१९), हेमंत दामोदर गाढवे -(३२४१), सुनील रामचंद्र गायकवाड -(३२७४), योगेश जयसिंग गोंधळे-(३३०९), दिलीप रामदास टकले -(३२२०), प्रशांत वसंतराव तुपे-(३१७५), अमोल भरतलाल धर्मावत-(३२२७),
विजय कृष्णाजी राऊत -(३२८४), अभिजीत चंद्रकांत शिवरकर -(३२८५), संजय जयवंतराव शेवाळे-(३२२९), चंद्रकांत अर्जुन ससाणे -(३२७५), यशवंत शिवराम साळुंखे-(३२१८),तसेच महिला राखीव गटातून सविता दिनेश गिरमे-(३१६९), रेश्मा दत्तात्रेय हिंगणे-(३०५७), अनुसूचित जाती-जमाती विभागातून रमेश बाबुराव काकडे-(३४३३),
इतर मागासवर्गीय विभागातून गणेश सुदाम फुलारे -(३४१७), भटक्या विमुक्त राखीव विभागातून विशाल संभाजी हाके-(३४१६) असे सन्मित्र प्रगती पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
प्रगती पॅनल च्या विरोधात एकूण सहा उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते.प्रतिस्पर्धी उमेदवारांना अवघ्या ३६५ मतांवर समाधान मानावे लागले. सन्मित्र सहकारी बँकेच्या निवडणुकीत ॲड.प्रभाकर शेवाळे , शिवाजी केदारी, बाळासाहेब कोद्रे,दामोदर राऊत, सुनिल बनकर, योगेश ससाणे, सोपान गोंधळे, मुनीर सय्यद, उत्तमराव रायकर यांचा सिहांचा वाटा असल्याचे बँकेचे मार्गदर्शक बाळासाहेब शिवरकर यांनी सांगितले.
सभासद मतदारांनी सन्मित्र प्रगती पॅनलच्या उमेदवारांना सुमारे साडेतीन हजार मतांचे मताधिक्य देवून जो विश्वास दाखवला आहे. तो यापुढेही अधिक सक्षमपणे काम करण्याची प्रेरणा देणारा आहे.
सर्वच १७ उमेदवारांना सोबत घेऊन आम्ही विकासाची बाजू सभासद मतदारांसमोर मांडली होती. त्याला उत्तम प्रतिसाद दिल्याचे या निकालातून दिसून येत आहे. सभासदांच्या उन्नतीसाठी ही बँक टिकली व वाढली पाहिजे, हीच अपेक्षा आहे.
– बाळासाहेब शिवरकर (सन्मित्र सहकारी बँकेचे मार्गदर्शक, माजी राज्यमंत्री)