Maharashtra Assembly Interim Budget। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करत आहेत. राज्यात येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे, त्यामुळे महायुतीचा हा अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेने अजित पवारांची अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात केली. 11 गडकिल्ल्यांना जागतिक पातळी वर जाण्यासाठी युनेस्कोला प्रस्ताव पाठवला आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाचं वाचन सुरू केले.त्यावेळी त्यांनी गडकिल्ल्याचा उल्लेख करत पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. त्यासोबतच राज्यात सहा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या आहेत. तसंच केंद्राकडून जीएसटीचे ८६१६ कोटी रुपये मिळाले, असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.
राज्यातील गुंतवणूक वाढवण्यावर भर Maharashtra Assembly Interim Budget।
सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू करण्यात आलं आहे. याशिवाय रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदराचं आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. त्यासोबतच राज्यातील गुंतवणूक वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. ७५००किमी रस्त्याची कामं हाती घेतली जातील. याशिवाय भारतातील पहिल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी भूसंपादन पूर्ण झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
वस्त्रोद्योग धोरणांतर्गत प्रत्येक रेशन कार्डावर साडी वाटपाचं काम हाती घेण्यात आलंय. नवी मुंबईतील विमानतळाचा पहिला टप्पा मार्च २०२५ मध्ये सुरू होणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
विकास धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली Maharashtra Assembly Interim Budget।
विकास धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. रत्नागिरीतील भागवत बंदरासाठी ३०० कोटींचा निधी, याशिवाय सामान्य प्रशासन विभागासाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूरद करण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर विमानतळासाठी आर्थिक तरतूद करण्यात आल्याचे अजित पवार म्हणाले