Maharashtra Budget Session 2024 Live । राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरूवात झाली आहे, दुपारी दोन वाजता अर्थमंत्री अजित पवार हे अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकार बजेटमधून कोणत्या घटकांना काय देणार, हे महत्त्वाचं असणार आहे. यासंदर्भातील सर्व अपडेट्स वाचा एकाच ठिकाणी…
– क्रीडा विभागासाठी ५३७ कोटींच्या निधीची तरतूद
-राज्यातील अंगणवाडी सेविकांची १४ हजार रिक्त पदं भरण्यात आली
-संजय गांधी निराधार योजनेत १००० ऐवजी १५००० पेंशन देणार
-अयोध्या व श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय
-अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत अनुदान २ लाखांवरून १० लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय
-बारा बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत गाडगेबाबा बारा बलुतेदार आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार
– राज्यातील सर्व कुटुंबांना महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. वार्षिक आरोग्य संरक्षणाची रक्कम प्रतिकुटुंब १ लाख ५० हजारांवरून ५ लाख रुपये करण्यात आली आहे
-महिला व बाल कल्याण विकास विभागास ३१०७ कोटी रुपयांची तरतूद
-महिलांना ‘पिंक रिक्षा’ उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबवण्यात येत आहे
-७ हजार मेगावॅट ऊर्जा निर्मितीचं सरकारचं लक्ष्य
-८ लाख सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार
-निर्यात वाढीसाठी ५ इंडस्ट्रियल पार्कची तरतूद
-सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू
-विकास धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली
-नवी मुंबईतील विमानतळाचा पहिला टप्पा मार्च २०२५ मध्ये
– आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेत राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहे
– आता ८,६०९ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर, साखर कारखान्यांसाठी २०० कोटी
– राज्यात सहा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या आहेत. तसंच केंद्राकडून जीएसटीचे ८६१६ कोटी रुपये मिळाले, असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.
– जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार
हेही वाचा ।
कुसुमाग्रजांच्या कवितेने अजित पवारांची अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात ; अर्थसंकल्पात गुंतवणुकीवर भर
महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवारांचं पहिलं बजेट
मनोज जरांगे यांच्या सुरुवातीपासून एक, एक मागण्या मान्य केल्या. त्या आपण मान्य केल्या. परंतु आता जरांगे यांची भाषा बदलली. आता ते महाराष्ट्र बेचिराख करण्याबाबत बोलू लागले. आपण हा डाव उधळल्याचे त्यांनी म्हटले. मग महाराष्ट्र बेचिराख करण्याची योजना कोणाची होती? याची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली.
महायुती सरकारचं बजेट सादर करण्याची ही अजित पवारांची पहिलीच वेळ आहे. जुलै २०२३ मध्ये अजित पवार हे बहुसंख्य आमदारांसह महायुती सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर अर्थमंत्री म्हणून ते काम बघत असून, त्यांचा हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे.
“संपवून टाकू, निपटून टाकू, बोलण्याची हिंमत जरांगेंमध्ये कशी आली?”; आशिष शेलार यांचा सवाल
– मुख्यमंत्री कोणाचा कार्यक्रम करतात हे माहित नाही. मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम करेल हे नक्की!
मुख्यमंत्री कोणाचा कार्यक्रम करतात हे माहित नाही.
मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम करेल हे नक्की!— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 27, 2024
हेही वाचा
जरांगेंच्या आंदोलनावर एसआयटी चौकशी होणार; विधानसभा अध्यक्षांचे आदेश
SIT चौकशीवर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले, “आता मी सर्व…”