Ajit Pawar On Sharad Pawar| शिरूर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची बुधवारी शिरूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेदरम्यान अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय शरद पवार यांनीच घेतला होता,असा खळबळजनक दावा केला. त्यावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांची प्रतिक्रिया Ajit Pawar On Sharad Pawar|
पक्षातील काही सहकारी भाजपसोबत जाण्यासाठी उत्सुक होते, मात्र भाजपसोबत जायचं असा निर्णय झाला नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी शरद पवार यांनी भाजपसोबत बैठका झाल्याच्या अजित पवार यांनी केलेल्या दाव्यावरही भाष्य केले. बैठका झाल्या, मात्र अंतिम निर्णय पक्ष घेईल, अशी भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले.
काय म्हणाले होते अजित पवार? Ajit Pawar On Sharad Pawar|
“भाजपसोबत जाण्याचा निर्णय शरद पवार यांनीच घेतला होता. याबाबत भाजपसोबत सहा बैठकाही झाल्या, मात्र शरद पवार यांनी अचानक आता भाजपसोबत नाही तर शिवसेनेसोबत जायचे असा निर्णय घेतला. मी शब्द दिला होता, म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली,” असेही अजित पवार यांनी सांगितले होते.
हेही वाचा:
प्रादेशिक पक्षांबाबतच्या वक्तव्यावर शरद पवारांनी म्हणाले,’मी असं बोललेलो नाही..’