मुंबई – पुरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात आले. प्रवाशांसाठी 37 डॉक्टर्स आणि अॅम्ब्युलन्सही घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच 14 बस आणि 3 टेम्पोच्या सहाय्याने प्रवाशांना सह्याद्री मंगल कार्यालय येथे पाठविण्यात येत असून याठिकाणी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान बदलापूर येथून प्रवाशांना त्यांच्या घरांकडे रवाना करता येईल. ज्या प्रवाशांना कोल्हापूरला जायचे आहे, अशा प्रवाशांसाठी कल्याण येथून विशेष ट्रेन सुटणार आहे.
Food served at Badlapur station by TC and station staff to the rescued passengers. #MahalaxmiExpress pic.twitter.com/uUZjOqOdiO
— Central Railway (@Central_Railway) July 27, 2019