Virender Sehwag T20 World Cup India’s Playing XI : आयपीएल 2024 मध्ये टी-20 विश्वचषक 2024 च्या चर्चेला वेग आला आहे. आयपीएलनंतर 1 जूनपासून अमेरिका आणि कॅरेबियन देशांमध्ये खेळला जाणारा टी-20 वर्ल्ड कप 2024 सुरू होणार आहे. विश्वचषकाबाबत एका गोष्टीची जोरात चर्चा होत आहे की, टीम इंडिया कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह स्पर्धेत उतरणार? या प्रश्नाला उत्तर देताना भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने या वर्षी जून-जुलैमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय प्लेइंग-11 खेळाडूंची निवड केली आहे.
T20 विश्वचषकासाठी संघ अंतिम करण्यासाठी ICC ने 1 मे ही तारीख निश्चित केली आहे. या स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करणार आहे. वीरेंद्र सेहवागने T20 वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या भारतीय प्लेइंग-11 मध्ये हार्दिक पांड्याचे नाव नाही. हार्दिक आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे. पण, कर्णधार आणि खेळाडू म्हणून त्याची कामगिरी उदासीन राहिली आहे. जरी सेहवागने पंड्याला प्लेइंग-11 मध्ये ठेवलेले नाही. पण, त्याला 15 सदस्यीय संघात निश्चितपणे स्थान देण्यात आले आहे. प्लेइंग-11 मध्ये संदीप शर्मा आणि शिवम दुबे या दोघांची नावे आश्चर्यचकित करणारी आहेत.
अशी आहे सेहवागची प्लेइंग इलेव्हन…
सेहवागने आपल्या प्लेइंग इलेव्हनची सुरुवात कर्णधार रोहित शर्मासोबत केली. रोहितसोबतच त्याने सलामीसाठी युवा डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वालची निवड केली. त्यानंतर टॉप ऑर्डर पूर्ण करत वीरूने विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर ठेवले आहे.
यानंतर, तो प्लेईंग इलेव्हनमध्ये पुढे गेला आणि टी-20 इंटरनॅशनलचा नंबर वन बॅट्समन सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर ठेवले. यानंतर त्याने या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असलेल्या ऋषभ पंतची पाचव्या क्रमांकासाठी निवड केली आहे. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्याने दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतवर विश्वास दाखवला आहे . कार अपघातातून सावरल्यानंतर पंतने आयपीएलमध्ये पुनरागमन केले असून तो जोरदार फलंदाजी करत आहे. यानंतर सेहवागने सहाव्या क्रमांकावर फिनिशरची भूमिका बजावण्यासाठी दोन पर्याय ठेवले, ज्यामध्ये रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांचा समावेश होता. सेहवागच्या संघात सहाव्या क्रमांकावर रिंकू किंवा शिवम असू शकतो.
अशा प्रकारे निवडली गोलंदाजी लाइनअप…
दोन फिरकीपटू म्हणून सेहवागने कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांना प्लेइंग-11 मध्ये ठेवले आहे. गोलंदाजीत त्याने रवींद्र जडेजाला फिरकी अष्टपैलू म्हणून निवडले. जडेजा सातव्या क्रमांकावर फलंदाजाची भूमिका बजावेल. त्यानंतर कुलदीप यादवची संघात मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून निवड केली आहे. त्याचबरोबर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि संदीप शर्मा यांची तीन वेगवान गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. संदीपचे नाव धक्कादायक आहे. तथापि, तो आयपीएल 2024 मध्ये चांगली गोलंदाजी करत आहे आणि तो एक विशेषज्ञ डेथ ओव्हर गोलंदाज आहे.
T20 विश्वचषकासाठी सेहवागने निवडलेली भारतीय प्लेइंग 11 :- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे/रिंकू सिंग, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि संदीप शर्मा.