मुंबई – मुंबईत बॉंबस्फोट घडवणार असल्याची खळबळजनक धमकी मुंबई पोलिसांना मिळाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांना ट्विटरवर टॅग करत ही धमकी देण्यात आल्याचे समजते. पोलिसांनी याबाबतचा तपास सुरु केला आहे.
महाराष्ट्रात अशा धमक्या मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देखील अशी धमकी आल्याचे समोर आले होते.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सोमवारच्या सुमारास मुंबई पोलिसांना ही धमकी मिळाल्याचे समजते. ‘मी लवकरच मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार आहे’ अशा आशयाचा मजकूर यावेळी पोस्टमध्ये लिहिण्यात आला होता.
Maharashtra | Mumbai Police received a threat around 11 am on May 22, after a person posted a threatening message on Twitter, “I am gonna blast the Mumbai very soon.” The police have started investigating the concerned account. Further investigation into this matter is underway:…
— ANI (@ANI) May 23, 2023
याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया टीमने ही पोस्ट पाहताच संबंधित पोलीस ठाण्याला याबाबतची माहिती दिली. ज्या ट्विटर अकाउंटवरून ही पोस्ट करण्यात आली त्याबाबतची माहिती सध्या पोलीस घेत आहेत.