पिंपरी – सर्व दुकाने बंद असतानाही दारूची चोरून लपून विक्री करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कासारवाडी येथे शनिवारी (दि. 11) सायंकाळी घडली.महेंद्र सुदाम कदम (वय 30, रा. महात्मा फुले नगर, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस कर्मचारी समीर लक्ष्मण रासकर यांनी शनिवारी (दि. 11) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळकर चाळ, रेल्वे गेटजवळ कासारवाडी येथे एकजण दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी छापा घालून एक हजार 155 रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या. पोलीस नाईक जी. एन. हिंगे याबाबत अधिक तपास करीत आहेत.