मुंबई – करोना व्हायरसचा वाढत्या प्रादुर्भावाला आळा बसण्यासाठी देशभरातील अनेक लोक घरातच राहत आहेत. त्यामुळे त्यांना पगार मिळणार आहे की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या वसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
अशोक चव्हाण म्हणाले कि, कर्जाचे हप्ते, क्रेडीट कार्डचे बिले, कॅश क्रेडिटचे व्याज, इन्स्टॉलमेंट्स काही दिवसांपुरते पुढे ढकलावे, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारकडे केली आहे, अशी मागणी ट्विटरद्वारे केली आहे.
#CoronaVirus मुळे ठप्प झालेला व्यापार-उदीम पाहता केंद्र सरकारने @RBI च्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात सर्व वित्तीय संस्थांच्या सर्व प्रकारच्या वसुलीला उदा. सर्व कर्जांचे हप्ते, EMI, CC चे व्याज, क्रेडिट कार्डांची बिले आदींना तात्काळ स्थगिती दिली पाहिजे.#AbKaroDeshKiRakhwali pic.twitter.com/rlTwuvwKST
— Ashok Chavan (@AshokChavanINC) March 23, 2020