जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळला
सातारा ( प्रतिनिधी) – जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात रविवारी दाखल केलेल्या ४५ वर्षीय महिलेचा रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात करोनाचा पहिला रुग्ण निष्पन्न झाला आहे.
या महिलेला खोकला असल्यामुळे रात्री उशिरा अनुमानित म्हणून शासकीय रुग्णालय येथे विलगीकरण कक्षात दाखल केले होते. या महिलाचा रिपोर्ट पुण्यातील ‘एनआयव्ही’कडून प्राप्त झाला असून ही महिला कोविड- 19 बाधित असल्याचे कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली.
या महिलेला उच्च रक्तदाबाचा त्रास 15 वर्षापासून आहे. त्यावर उपचार चालू आहेत. सध्या या महिलेचा रक्तदाब नियंत्रणात आहे. तसेच या महिलेला सध्या विलगीकरण कक्षात ठेवले असून प्राथमिक तपासण्यानंतर या महिलेची प्रकृती स्थिरआहे असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
तथापि कोणीही घाबरून जावू नये, जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासानाला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.