नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीसाठी आपने गुरूवारी प्रचारगीत जारी केले. जेल के जवाब में हम वोट देंगे असे त्या गीताचे शीर्षक आहे. प्रचारगीतामधून आपने पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर फोकस ठेवला आहे. त्या माध्यमातून मतदारांची सहानुभूती मिळवण्याची रणनीती आपने आखल्याचे सूचित होते. (AAP campaign song focuses on Kejriwal’s arrest)
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीने केजरीवाल यांना २१ मार्चला अटक केली. ऐन निवडणूक काळात ती घडामोड घडली. केजरीवाल सध्या तिहार तुरूंगात आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत आपला निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. त्या पक्षाने याआधी जेल का जवाब वोट से या संकल्पनेवर आधारित प्रचार मोहीम हाती घेतली.
MUST WATCH🔥👇
AAP’s Campaign Song For 2024 Lok Sabha Elections Is OUT NOW 🎶🎵#AAPKaCampaignSong pic.twitter.com/8dJPAhN3wx
— AAP (@AamAadmiParty) April 25, 2024
आता आपने प्रचारगीत जारी केले आहे. पक्षाचे दिल्लीतील आमदार दिलीप पांडे यांनी ते रॅप स्टाईलमधील प्रचारगीत लिहिले आणि गायले आहे. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा घटक म्हणून आप लोकसभा निवडणुकीला सामोरा जात आहे. आता प्रचारगीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचवण्याचा संकल्प त्या पक्षाने केला आहे.