राजगुरूनगर -खेड तालुक्यात 24 तासांत तालुक्यात नव्याने 25 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत, तर कुरकुंडी येथील एका 72 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाला आहे. सध्या बाधितांचे प्रमाण कमी झाले असून आकडा दोन हजारांच्या जवळ गेला असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
तालुक्यात आतापर्यंत बाधितांची संख्या 1860 तर मृतांची संख्या 48वर पोहोचली आहे. 1504 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून 308 जणांवर उपचार सुरू आहेत. तालुक्याच्या सुमारे 100पेक्षा जास्त गावांमध्ये करोना पसरला आहे. करोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या चाकण नगरपरिषद हद्दीत 24 तासांत केवळ एकच बाधित आढळल्याने चाकणकरांसह प्रशासनास थोडा दिलासा मिळाला आहे.
मागील 24 तासांत चाकण (1), आळंदी (4), राजगुरूनगर (7) अशा तीन नगर परिषदा मिळून 12 तर ग्रामीण भागातील काळूस (1), मोई (2), धानोरे (2), शेलगाव (1), कुरकुंडी (1) वेताळे (1), दौंडकरवाडी (1), पिंपरी बुद्रुक (1), रासे (3), या 9 गावांत 13 असे एकूण 25 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.